आचरा येथील खुल्या गटातील समुह नृत्य स्पर्धा – व्हिक्टोरी ग्रुप देवगड संघ विजेता !

परी ग्रुप कुडाळ – द्वितीय क्रमांक तर न्यू इंग्लिश स्कूल आचरा व एस. के. ग्रुप कणकवली-तृतीय क्रमांक

श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडीचे आयोजन

आचरा ( प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवा निमित्त श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडी आयोजित, श्री रामेश्वर मंदिर आचरा येथे पार पडलेल्या खुल्या समुह नृत्य स्पर्धेत व्हिक्टोरी ग्रुप देवगड संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर परी ग्रुप कुडाळ संघाला द्वितीय क्रमांकआणि न्यू इंग्लिश स्कूल आचरा आणि एस. के. ग्रुप कणकवली या दोन संघाना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.

प्रथम क्रमांक विजेत्या व्हिक्टोरी ग्रुप देवगड संघाला 15,021 चषक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक विजेत्या परी ग्रुप कुडाळ संघाला 10,021 चषक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक विजेत्या न्यू इंग्लिश स्कूल आचरा आणि एस. के. ग्रुप कणकवली 5021/- चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच श्री समर्थ समई कला पथक खुडी, डोंगरेवाडी गर्ल ग्रुप आचरा, मिळुनी साऱ्याजनी नांदगाव, व्हिक्टर क्यू डान्सर्स आचरा, हे इतर संघ उपस्थित होते त्याना मानधन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून मुंबई येथील बसुराज गुरव आणि रुपेश साटम यांनी काम पाहिले. सूत्र संचालक म्हणून श्री आजगावकर सर मालवण आणि मंडळाचे अध्यक्ष मुकेश सावंत यांनी काम पाहिले.

या वेळी देवस्थान कमिटीचे सचिव संतोष मिराशी, खजिनदार कपिल गुरव, मंगेश मेस्त्री, पवनकुमार पराडकर, बाबू परुळेकर, रवींद्र गुरव आदी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन केल्या बद्दल सर्व आलेल्या ग्रुप कडून तसेच रसिक प्रेक्षकांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!