गुणवंत शिक्षक किशोर कदम यांचा ओसरगांव मध्ये नागरी सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने ओसरगाव प्राथमिक शाळा १ चे मुख्याध्यापक किशोर कदम यांचा ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने शाळेच्याच सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना किशोर कदम यानी ग्रामस्थांचे सहकार्य आणि सहशिक्षक यांच्या सोबतीने केलेल्या शैक्षणिक कामामुळे मला प्रशासनातर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी किशोर कदम यांना जाहीर झाला. यानिमित्ताने त्यांचा माजी विद्यार्थी समिती, शालेय व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षण प्रेमी, ग्रामस्थ यांच्या वतीने हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा माजी जेष्ठ शिक्षिका वंदना विजय आपटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री कदम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अँड.विलास परब,विवेक परब,जगन्नाथ राणे , प्रवीण नाईक,सुदर्शन नाईक, दिपक आंगणे,अध्यक्ष जीवबा अपराज, उपाध्यक्ष जाधव मॅडम राजेश कदम, रसिका तांबे ,सुप्रिया अपराध संदेश नाईक, अपेक्षा चव्हाण,शिक्षिका शितल दळवी, राजश्री तांबे, प्रमिता तांबे मॅडम आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अँड.विलास परब म्हणाले,श्री कदम यांनी मुख्याध्यापक म्हणून पालक शिक्षक विद्यार्थी यांचा योग्य समन्वय ठेवला. विविध साहित्यिक उपक्रम त्यांनी राबविले. अजय कांडर यांच्यासारख्या नामवंत कवीला निमंत्रित करून त्यांची मुलाखत विद्यार्थ्यांना घ्यायला लावली. ही मुलाखत आपल्याला युट्युबवर पाहायला मिळते. विद्यार्थ्यांचे दिवसभराचे साहित्य संमेलन भरविले. असा शिक्षक ज्या शाळेला लाभतो त्या शाळेची, विद्यार्थ्यांची सांस्कृतिक प्रगती होतच असते. क्रीडा स्पर्धत शाळेचे नाव उंचावले गेले. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळविले. शाळेतील गुणवंत शिक्षकांमुळेच हे घडू शकले.सुत्रसंचलन विवेक परब यांनी केले.

error: Content is protected !!