निलेश राणेंचे शिवसेनेत स्वागतच ; महायुती मजबूत करणारा हा प्रवेश

आता शिवसेना कार्यकर्त्यांना महायुतीत मिळणार सन्मान – शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : भाजप पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे साहेबांचे मोठे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांचे शिंदेसेनेत प्रवेश करणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे.अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रवक्ते व कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत असणाऱ्या राणेसहेबाना नगरसेवक,आमदार, मंत्रीपद व मुख्यमंत्री पद मिळाले हे केवळ शिवसेना पक्ष प्रमुख माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच.हे फक्त शिवसेनेतच घडू शकते.आता तर खुद्द निलेश राणेंच्या रूपाने पुन्हा शिवसेना प्रवेश होणे म्हणजे एक ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल. कारण एक वर्तुळ या निमित्ताने पूर्ण होईल.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे, तसेच पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या विचारांची शिवसेना वाढीसाठी निलेश राणे यांचा प्रवेश फायदेशीर ठरेल. त्यांचे समर्थक सहकारी पूर्ण जिल्ह्यात ताकदीने शिवसेना वांढवतील. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही आमदार हे महायुती चे निवडून येतील.ज्याप्रमाणे लोकसभेला भाजपला शिवसेनेने साथ दिली तशीच भक्कम साथ विधानसभेला शिवसेना देईल. आता सावंतवाडी कुडाळ प्रमाणे कणकवली तेही शिवसेनेचा पदाधिकाऱ्याला मान सन्मान व समानतेची वागणूक मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. असे देखील श्री गुरव यांनी म्हंटले आहे.

महायुती ही हिंदुत्वाच्या भक्कम पायावर उभी असून देशात नरेंद्र मोदी व राज्यात शिंदे साहेबांचा आदर्श विकासा भिमुख कारभार व विकसित राष्ट्र निर्मितीच्या संकल्पना साकार करून देश प्रगती पथावर नेण्यासाठी सज्ज व्हा.असे आवाहन निलेश राणे यांचे स्वागत करताना शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंगेश गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना केले आहे.

error: Content is protected !!