सातरल- कासरल भाजपचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कणकवली तालुक्यातील सातरल- कासरल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे पुरस्कृत महिला भजनी बुवांचा डबलबारी सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा महिला डबलबारी सामना प्रसिद्ध बुवा ऋतुजा पाळेकर -सावंत आणि बुवा साची मुळम या दोघात रंगणार आहे.यादरम्यान दुपारच्या सत्रात दोन्ही गावातील महिला गटांच्या फुगडी स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत.हे सर्व कार्यक्रम पुर्ण-प्राथमिक शाळा सातरल-कासरल येथे होणार आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला महिला भजनी बुवांच्या सुस्वर भजनांचा आनंद घेता यावा. भक्ती मय वातावरणात नवरात्र उत्सवाचा जागर व्हावा.यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सातरल-कासरल भाजप च्या वतीने करण्यात आले आहे.












