रसिका पाटील ठरल्या पैठणीच्या मानकरी!

मसुरे (प्रतिनिधी) : श्री.नवदुर्गा कला क्रीडा मंडळ आयोजित आणि अनिल कांदळकर व राकेश परब प्रायोजित खेळ पैठणीचा या स्पर्धेत रसिका प्रमोद पाटील पैठणीच्या मानकरी ठरल्या.

द्वितीय क्रमांक प्रतीक्षा हळदणकर, तृतीय क्रमांक शैलजा नरसाळे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. 31 स्पर्धेकांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन कुडाळ येथील राकेश हळदणकर यांनी तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.

error: Content is protected !!