मुंबई – गोवा महामार्गावर नडगीवे घाटात ट्रकला अपघात

अपघातात एक मयत तर एक जण जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटण नजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज सकाळी पहाटेच्या वेळी गोवा वरून आलेला व मुंबई च्या दिशेने असा जात असलेल्या ट्रेलर तथा ट्रक वाहन क्र.जी जे ०१ जे टी ४६६९ चा वाहनावरील ताबा सुटल्याने मोठा अपघात झाला.यामध्ये वाहनचालक सतिषकुमार साकेत वय -२१ राहणार मध्यप्रदेश हा चालक जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला दुसरा वाहन चालक चालक केशरासिंग राठोड राहणार राजस्थान भिलवाडा हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,नडगीवे बांबरवाडी घाटीत तीव्र वळणावर लोखंडी साहित्याने भरलेला टेलर वरील चालकाचा ताबा सुटल्याने टेलर हा गोवा वरून येत असताना नडगिवे बांबरवाडी येथे अवघड वळणार येताच वाहनचालकांचा ताबा सुटून गाडी दुभाजक क्रॉस करून विरुद्ध दिशेच्या लेन वर जाऊन महामार्गावर वरील लोखंडी सपोर्ट गार्ड तोडून येथे महामार्गावर असलेल्या एका पटरी मध्ये घुसला व पलटी होऊन मोठा अपघात झाला.

सदर अपघाताची माहिती स्थानिक रहिवासी विनोद पाटील यांनी गावचे पोलीस पाटील जितेंद्र मण्यार यांच्या मार्फत पोलिसांना दिली.या अपघातामध्ये एकजण जखमी असून त्यास पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आलेले आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक -मुंडे, पोलीस नाईक -माने,खारेपाटण दूरक्षेत्र चे पोलीस अंमलदार -पराग मोहिते यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व जेसीबीच्या साहाय्याने ने साहित्य बाजूस करून मयत व्यक्तीची तपासणी केली. मयत हा राज्य- मध्य प्रदेश येथील असल्याचे समजते आहे.अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दिवसेंदिवस अवघड वळणामुळे धोकादायक बनला असून खारेपाटण नडगिवे घाटात तर नेहमी अपघात घडत असून हा तिसरा मोठा अपघात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.तर या अपघातात महामार्गावर लागून असलेले नडगिवे बांबरवाडी येथील विनोद पाटील यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण दूरशेत्राचे पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!