कोणी स्मशान भूमी देता का स्मशान भूमी

अनुसूचित जाती बांधवांना अद्यापही स्मशानभूमी नाही

विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवणार – सुजित जाधव

कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, काही सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी सगळा अनुसूचित जाती जमाती समाज तुमच्या पाठीशी आहे असे सांगून स्वतःची आणि नेत्यांची दिशाभुल करण्यात काही पक्षाचे पदाधिकारी व्यस्त आहेत, परंतु भाजपा पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना कधी विचारले आहे का ? आमच्या अनुसूचीत समाजासाठी किती गावात स्मशानभूमी आहे , ग्रामीण भागात सार्वजनिक स्मशानभूमीत आमचे मयत आजही जळता येत नाही मग आम्ही मेल्यानंतरही वनवासी का ? असा संतप्त सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केला आहे.

आज कणकवली , देवगड, वैभववाडी तालुक्यातील 80 % ग्रामपंचायती वर मागील 20 ते 25 वर्षे सत्ता भाजप ची आहे परंतु त्यातील 75% गावात आजही अनुसूचित समाजासाठी चांगली शेड सोडा , जागाही नाही आणि स्टँड सुधा नाही लाकडे तर दूर ची गोष्ट मग दलीत समाज तुम्हाला काय म्हणून साथ देणार.हल्लीच सामाजिक एकता मंच आहे आणि सुशांत नाईक यांनी 10 कोटीचा बँच घोटाळा प्रकरणी जोरदार आवाज उठवला पण स्थानिक आमदार आणि स्वतःला अनुसूचित जाती चे नेते म्हणणारे तोंडावर बोट ठेऊन गप्प आहे , स्टँड पेक्षा प्रत्येक गावात दलीत समाज साठी स्मशानभूमी बांधली असती तर दलीत विकास निधी योग्य ठिकाणी वापरला गेला असता .

आता वेळ निघून गेली आहे अनुसूचित जाती समाजाचा राजकारण म्हणून वापर करणाऱ्यांना लवकरच जनता जागा दाखऊन देणार असा इशाराही सुजित जाधव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!