उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय राजर्षी लघुचित्रपट महोत्सवात उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार प्राप्त झालेल्या दायित्व टीम मधील सर्व कलाकार आणि सहकारी यांचा विशेष सन्मान भाजपा वेंगुर्ल्या व ” कलावलय ” संस्थेच्या वतीने करण्यात आला.

वेंगुर्ला ही कलाकारांची खाण असून दायित्व लघुपटात नवोदित कलाकारांनी सहभाग घेत वेंगुर्ल्याच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला, वेंगुर्ला मधील दयनीय रस्त्यांची स्थिती वर भाष्य करत अथर्व यु ट्यूब च्या माध्यमातून त्यांनी या लघुपट प्रसारीत करीत या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सुमारे १०० लघुपटामधून दायित्वने आशय, विषय मांडणी, दर्जा, अभिनय, संगीत आणि अभिनय माध्यमातून प्रथम क्रमांकाची बाजी मारली. नवोदित कलाकाराना प्रेरणा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वेंगुर्ल्याच्या वतीने सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जेष्ठ रंगकर्मी संजय पुनाळेकर यांनी कलाकारांचे कौतुक करीत त्यांना रंगभूमीवर येण्यासाठी आवाहन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर दायित्व चे दिग्दर्शक मनोहर कावले यांनी लघुपटाचा प्रवास कथन करून सत्कार बाबत आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, कलावलय वेंगुर्ला चे अध्यक्ष सुरेंद्र खांमकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, खजिनदार दिगंबर नाईक, जेष्ठ कलाकार रमेश नार्वेकर, आत्माराम सोकटे सर, जेष्ठ दिग्दर्शक सुहास खानोलकर, जितेंद्र वजराटकर, अमेय तेंडोलकर, चतुर पार्सेकर, बापू वेंगुर्लेकर, मयूर वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते .

दायित्व चे दिग्दर्शक मनोहर कावले, निर्माता विद्धेश आईर, लघुपटामध्ये सहभागी जेष्ठ कलावंत रमेश नार्वेकर, नरहरी खानोलकर , रघुनाथ कुडपकर, मयूर पवार, सुहास मांजरेकर आदींचा गुलाब पुष्प आणि शाल देऊन व पूर्ण टीमला मानपत्र देऊन विशेष सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठान चे डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!