डीपी रोड नव्हे पार्किंग रोड

नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची जनतेची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील तेली आळी ला जोडणारा डीपी रोड हा आता पार्किंग रोड बनला आहे. या डीपी रोडच्या दुतर्फा चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात . त्यामुळे सतत वाहतूककोंडी होत आहे. बेशिस्त वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायत ने कडक पावले उचलावीत अशी मागणी जनतेतून होत आहे. गणेशचतुर्थी काळात उत्तम नियोजन करणाऱ्या मुख्याधिकारी यांनी या समस्येकडे लक्ष घालून सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!