ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा
फाेंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मधील कट्टर आणि जेष्ठ शिवसैनिक भाई हळदिवे यांनी आमदार नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. स्व. बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून भाई हळदिवे हे फोंडाघाट पंचक्रोशीत ओळ्खले जातात. मागील 30 वर्षांत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता भाई यांनी शिवसेना पक्षाशी निष्ठा राखली.अनेक राजकीय बदल झाले तरीही त्यांनी कट्टर शिवसैनिक म्हणूनच राहणे पसंत केले. फोंडाघाट गावातील सामाजिक प्रश्नांवर उत्स्फूर्तपणे न्याय मागण्यासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यानी प्रशासकीय यंत्रणेला देत समाजाचे प्रश्न सोडवून घेतले. भाई हळदिवे यांचे फोंडाघाट मध्ये मोठे प्रस्थ असून त्यांनी आमदार नितेश राणे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.या भेटीमुळे भाई हळदीवे ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याची शक्यता आहे.