एकूण ४३ रक्तदात्यानी केले रक्तदान
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाच्या वतीने व खारेपाटण सिनियर कॉलेज एन एस एस विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ आज खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.तर या शिबिरात सुमारे ४३ रक्तदात्यानी रक्तदान केले.
यावेळी खारेपाटण सिनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,एन एस एस विभागाचे प्रमुख प्रा.वसीम सय्यद सर,ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी डॉ.संकेत रोटे,खारेपाटण पोलीस दुरशेत्राचे पोलीस अंमलदार श्री.माने खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,मंगेश गुरव,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये,सुरेंद्र कोरगावकर आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तर खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाच्या वतीने खारेपाटण सोसायटीचे सचिव अतुल कर्ले,तसेच खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे नव्याने रुजू झालेले पोलीस अंमलदार श्री माने यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.या रक्तदान शिबीराला खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते चंद्रमोहन शिंदे,अरविंद कर्ले,श्रीकांत भालेकर,सुबोध देसाई, बळीराम भालेकर,धनराज शेलार,चंद्रकांत मण्यार,सुधाकर कर्ले, विनोद शेलार,महेश राऊत,अशोक पाटील,अरुण कर्ले,संदीप सावंत, बाळा राऊत,सुनील कर्ले,दिगंबर भालेकर,जगदीश सावंत,नाना शिंदे आदी उपस्थित होते.
खारेपाटण येथील रक्तदान शिबिराकरीता जिल्हा रुग्णालय ओरोस रक्त पतपेढीचे डॉ.संकेत रोटे यांसह टेक्निशियन मयुरी शिंदे,नेहा परब,तसेच कांचन परब,नंदकुमार आडकर, नितीन बावकर,मिलिंद कांबळे आदी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.तर खारेपाटण पंचक्रोशीतील ग्रामस्थानी तसेच खारेपाटण महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत शिबिराला सहकार्य केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज संघटनेचे सचिव ऋषिकेश जाधव यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.