गावभेटी कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण विभागातील गावातल्या जनतेशी साधला संवाद

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षाकडून अधीकृत पणे पहिली उमेदवाराची नावे जाहीर जाहीर करण्यात आली असून यामध्ये कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघासाठी जाहीर झालेले कोकणातील पहिले उमेदवार नितेश राणे यांनी आज प्रथमच खारेपाटण विभागात येणाऱ्या गावातील जनतेशी गावभेट कार्यक्रमा दरम्यान संवाद साधला व जनतेचा आशिर्वाद घेतला.

यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर,माजी मंडल अध्यक्ष संतोष कानडे,सचिव- मनोज रावराणे,माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार,माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे,खारेपाटण भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,सूर्यकांत भालेकर,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम,भाजप पक्ष ओबीसी महिला आघाडी प्रमुख उज्ज्वला चीके,सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेठ गुरव,प्रवीण लोकरे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थिती होते.

खारेपाटण रामेश्वर नगर येथे खारेपाटण गावभेट दरम्यान झालेल्या संवाद मेळाव्याला महिलांची उपस्थिती मोठी होती.यावेळी खारेपाटण येथील समर्थ महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सौ.जागृती पोटले यांनी केद्र सरकरच्या वतीने नवी दिल्ली येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात कोकणातून निवड झाल्या बद्दल तिचा आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची इसवलकर यांनी केले.तर आभार सुधीर कुबल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!