उबाठाला धक्क्यावर धक्के | निवडणूकीच्या तोंडावर उबाठाच्या पदाधिकऱ्यांचा जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वारगावचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांचा भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुक मतदानाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. वारगाव येथील उबाठा सेनेचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी श्री. महेंद्र केसरकर यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल, आश्वासित केले.

यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, बाळा जठार, नाना शेट्ये, राजा जाधव उपस्थित होते.

error: Content is protected !!