वैभववाडी मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे ताे पुन्हा महाराष्ट्राला दाखवून द्या – आमदार नितेश राणे

आमदार नितेश राणे यांच्या वैभववाडी येथील प्रचाराचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : तळकोकणात महायुतीकडून भाजपाला हा एकमेव मतदार संघ मिळाला असला तरी सर्वात जास्त मताधिक्य आम्हांलाच मिळेल. असा विश्वास आपण पक्ष नेतृत्वाला दिला आहे. आमच्या समोर कोण उमेदवार राहायचा तो राहूदे. हा मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. हे आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दयायचे आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

वैभववाडी येथील खोरकर अरुळेकर रावराणे सभागृहात आमदार राणे यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडल्या नंतर आयोजित प्रचार सभेत आमदार राणे बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, सज्जनकाका रावराणे, संभाजी रावराणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, शारदा कांबळे, विजय तावडे, स्नेहलता चोरगे, सीमा नाणीवडेकर, हुसेन लांजेकर, स्वप्नील खानविलकर यांच्यासह मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राणे पुढे म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण, वयोश्री योजना सारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. त्याचा लाभ तळागाळातील लाभार्त्यांना मिळत आहे. लाडकी बहीण योजनेने महिलांची दिवाळी गोड केली आहे. मात्र उद्धव ठाकरे व काँग्रेसवाले या योजना बंद करणार असे जाहीर सांगत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी ठरवायचे आहे. योजना आयुष्यभर सुरु ठेवणारांना सतेत्त बसवायचे की योजना बंद करणारांना असा सवाल त्यांनी केला. या मतदार संघातील १ लाख १२ हजार लाडक्या बहिणी असून यापैकी ७५ हजार बहिणींना योजनेचा लाभ मिळाला आहे.

या मतदार संघात आपण दहा वर्षें आपल्या सोबत काम करीत आहे. यातील आठ वर्षे विरोधी पक्षात गेली. तर दोन वर्षे सतेत गेली आहेत. या दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तालुक्यासाठी मोठा निधी दिला आहे. या मतदार संघाच्या विकासासाठी आपण काम केले आहे. तुम्ही सांगितले ते देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. राज्यात व विधानसभेत ताट मानेने उभे राहण्याची संधी मला तुमच्यामुळे मिळाली आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार आहे. मी हवेत राहणार नाही व कोणाला कमी सुद्धा लेखणार नाही. परंतु तुमच्यावर माझा विश्वास आहे.

नियोजनासाठी वैभववाडी पॅटर्न राज्यात वापरण्यासारखा.
वैभववाडी तालुका हा नियोजन व नियोजन बद्ध कामाच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. त्यांच्याकडून करण्यात येत असलेले सूक्ष्म नियोजणाचे आमदार राणे यांनी कौतुक करून वैभववाडीचा हा पॅटर्न राज्यात लागू करण्यासारखा आहे. लोकसभा निवडणुकीत खा. राणे साहेबांना मिळालेल्या मताधिक्यात वैभववाडी तालुक्याचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.सभेचे सूत्रसंचालन भालचंद्र साठे यांनी, तर प्रास्ताविक प्रमोद रावराणे यांनी केले. आभार सुधीर नकाशे यांनी मानले.

या सभेत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात आमदारांच्या उपस्थित प्रवेश केला. यानंतर सभागृहा पासून भाजपा कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांसह रॅलीत सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली.

error: Content is protected !!