निलेश राणे शिवसेना पक्षप्रवेश सोहळा

खासदार नारायण राणेंचे व्यासपीठावर, नीलम राणेंचे सभास्थळी आगमन

कुडाळ (प्रतिनिधी) : जेष्ठ सुपुत्र निलेश राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यासाठी खासदार नारायण राणे यांचे सपत्नीक नीलम राणे यांच्यासह कुडाळ येथील सभास्थळी आगमन झाले.खासदार नारायण राणे यांचे व्यासपीठावर आगमन होताच उपस्थित शिवसैनिक महायुती च्या कार्यकर्त्यानी एकच जल्लोष व्यक्त केला. जेष्ठ सुपुत्र निलेश राणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा पाहण्यासाठी निलमताई राणे ह्या स्टेजसमोर प्रेक्षकांमध्ये विराजमान झाल्या. निलेश राणे यांचा पक्षप्रवेश सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण सभामंडप खचाखच भरला होता.

error: Content is protected !!