निलेश राणे शिवसेना पक्षप्रवेश सोहळा

कुडाळ मालवण च्या सर्वांगीण विकासासाठी निलेशला आमदार निवडा – खासदार नारायण राणे

राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या पूर्वेतिहासाचा केला पंचनामा

कुडाळ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निलेश राणेंच्या शिवसेनेमधून निलेश राणे यांच्या उमेदवारी ची घोषणा करणार आहेत. कुडाळ मालवण चा मी आमदार होतो. 6 वेळा सिंधुदुर्गातील जनतेने मला आमदार केले.ही निवडणूक राज्यासाठी आणि देशासाठी महत्वाची आहे. सिंधुदुर्ग च्या विकासासाठी मला औद्योगिक कारखाने आणायचे आहेत. यासाठी जिल्ह्यातील तरुण तरुणींना प्रशिक्षण मिळावे म्हणून मी ओरोसला प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या साहित्याचा कारखाने विशाखापट्टणम ला आहेत. असे कारखाने आपल्या जिल्ह्यात असावे यासाठी मी दोडामार्ग ला 1 हजार 400 एकर जागेवर midc उभारत आहे. वीज रस्ते पाणी ह्या पायाभूत सुविधा मी सिंधुदुर्गात आणल्या.इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज उभारले. 600 विद्यार्थी मेडिकल आणि 2 हजार विद्यार्थी इंजिनिअरिंग चे शिक्षण दरवर्षी घेत आहेत. नोकरी मिळेल असा एकतरी प्रकल्प विरोधकांनी आणला काय ? फक्त नारायण राणे आणि राणे कुटुंबावर टीका करायची हा एकमेव अजेंडा.नारायण राणे नसता तर तेली ही दिसला नसता आणि उपरकरही दिसला नसता. तेव्हा उपरकर आणि तेली लाही घर नव्हते. उपरकरचे आता घर आहे. तेली चा आता कणकवलीत आणि सावंतवाडी ही बंगला आहे. हा पैसे आले कुठून ? कमिशन हा एकमेव याचा धंदा. राजन तेली ला बांद्रा बिकेसी येथे 4 कोटींचे घर दिले. एकही मत नसताना राजन तेली ला विधानपरिषदेचा आमदार केला. आता माझ्यावर टीका करतोय असे सांगत राणे यांनी उपरकर आणि तेली यांच्या पूर्वेतिहासाचा पंचनामा केला. आज सिंधुदुर्गात स्पर्धा परिक्षातून विद्यार्थी अधिकारी बनताहेत. मुख्यमंत्री काळात अडीच वर्षांत केवळ 2 तास उद्धव ठाकरे मंत्रालयात आले. महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचा भकास झाला. पण मागील 2 वर्षांत महायुती सरकारने जनहीताचे निर्णय घेत राज्याचा विकास केला. लाडकी बहीण योजना बंद करण्याची वल्गना उद्धव ठाकरे करतात. ही विधानसभा निवडणुक ही राज्याच्या सर्वांगिण विकासाची आहे.एकनाथ शिंदेंचे मन मोठे आहे. त्यांनी निलेश ला बोलावून घेत कुडाळ मालवण ची उमेदवारी शिवसेनेतून देऊ केली.मी शिंदेंचे आभार मानतो. कुडाळ मालवण चा विकास व्हायचा असेल तर निलेश राणे आमदार असायला हवा.राज्यात महायुती चे सरकार यायला हवे असेही खासदार राणे म्हणाले

error: Content is protected !!