निलेश राणेंच्या रुपात कुडाळ मालवण मधून शिवसेना महायुती विजयी गुलाल उधळणार
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी निलेश राणेंच्या विजयाची दिली ग्वाही
कुडाळ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कुडाळ मालवण मधून शिवसेनेचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती.शिंदे साहेबांनी निलेश राणे यांच्या रुपात आमची मागणी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.23 नोव्हेंबर रोजी निलेश राणेंच्या विजयाच्या रुपात शिवसेनेचा आणि महायुतीचा विजयी गुलाल उधळनार असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे म्हणाले.आग्रे पुढे म्हणाले की सिंधुदुर्गात महायुती चे तिन्ही उमेदवार निवडून येणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. फक्त प्रश्न आहे की लीड कोणाचे जास्त असणार ? दिवाळी चे 5 दिवस सोडले तर उर्वरित सर्व दिवस आपल्याला निलेश राणेंसोबत द्यायचे आहेत. 10 वर्षे कुठलेही पद नसताना निलेश राणेंनी कुडाळ मालवणच्या जनतेसाठी











