निलेश राणे शिवसेना पक्षप्रवेश सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिक्षणमंत्री केसरकर यांचे सभास्थळी व्यासपीठावर आगमन

कुडाळ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासदार निलेश राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर आगमन झाले. टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री शिंदे यांचे सभेला उपस्थित जनतेने जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांचेही आगमन झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते मुख्यमंत्री व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!