मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंना कुडाळ मालवण मधून शिवसेनेची उमेदवारी केली जाहीर
निलेश राणेंचा शिवसेना प्रवेश ऐतिहासिक ; 23 नोव्हेंबर ला निलेश च्या विजयाचे फटाके फोडायला येणार
कुडाळ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा झेंडा हाती देत माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेशा नंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी निलेश राणे यांची कुडाळ मालवण मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, राजापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आजचा दिवस हा सिंधुदुर्गवासीयांसाठी खास आहे.निलेश राणे यांची शिवसेनेत घरवापसी आहे. खासदार नारायण राणेंच्या परवानगीमुळे निलेश चा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. निलेश राणेंच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे. लोकसभेला असलेले लीड आता 52 हजारांचे होईल याची गॅरंटी आहे. नारायण राणेंचा लोकसभेचा विजय ही झंकि है निलेश राणे बाकी है असे म्हणत शिंदे यांनी निलेश राणेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. दिवाळीचे फटाके तुम्ही फोडाल पण 23 नोव्हेंबर ला मी निलेश राणेंच्या विजयाचे फटाके फोडायला येईन. जिथून नारायण राणेंनी आपल्या आमदारकीची सुरुवात केली त्याच ठिकाणी निलेश राणे विधानसभा लढवणार आहे. हे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी धाडस केले आणि राज्यात नवीन सरकार आणले. बाळासाहेबांचे विचार आणि तत्व सत्तेसाठी सोडलेल्यापासून आम्ही दूर गेलो. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या आणि दोन वेळा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या काँग्रेस समोर गुडघे टेकणाऱ्या ना धडा शिकवण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले. मागील 5 तास तुम्ही थांबला आहात. एवढा वेळ कोण थांबते ? हे सगळे कार्यकर्ते प्रचाराला उतरल्या नंतर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी संघटनेत आणि विधानसभेत काम केले आहे. कार्यकर्ता कसा जपावा हे राणेंकडून शिकावे. फेक नॅरीटेव्ह पसरवूनही नारायण राणेंना तुम्ही खासदारपदी निवडून दिले. कोकणात शिवसेना वाढविण्यात राणेंचा सिंहाचा वाटा असतो. पण ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो त्याला मास लीडर चालत नाहीत. कदृ वृत्तीमुळे राणे राज ठाकरे माझ्यासह 50 आमदार बाहेर का पडले ? असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. पूर्वी बाळासाहेब असताना दिल्लीपासून सगळे नेते मातोश्री वर यायचे आता मातोश्री सोडून गल्लीत फिरावे लागतेय की मला नेता करा.त्यांचा चेहरा मित्रपक्ष ला चालत नाही तर जनतेला कसा चालेल. बालेकिल्ला असतानाही उबाठा सेनेचा एकही खासदार कोकणात निवडून आले नाही. मात्र उबाठा सेनेशी वन टू वन लढतीत 13 पैकी 7 खासदार आमचे निवडून आले. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून वेगळी भूमिका घेणाऱ्या उबाठा सेनेला त्यांची जागा जनता दाखवल्या शिवाय राहणार नाही.महायुती चे सरकार स्थापन केल्यापासून सर्वसामान्य जनतेला काय हवे याचा विचार करून अनेक प्रकल्प आणि कल्याणकारी योजना आणल्या. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महिलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टात गेली.खोडा घालणाऱ्या ना अद्दल घडविणार .केवळ दीड हजार देऊन आम्ही थांबणार नाही तर त्याना लखपती करणार.लाडक्या भावाना सुद्धा स्टाय पेंट द्वारे दरमहा मानधन दिले.शिक्षण शेती क्षेत्रातही अनेक निर्णय आम्ही घेतले.











