वैभववाडी शहराकडे गव्याची वाटचाल शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण

सांगुळवाडी रोड परिसरात पहाटे व सायंकाळी प्रवासादरम्यान नागरिकांनी दक्षता घ्यावी स्थानिक प्रशासनाचे आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरालगत असलेल्या डोंगरी भागात तसेच सांगुळवाडी, एडगाव, वायंबोशी या परिसरात वावरताना गवारेड्यांचा कळप अनेक वेळा स्थानिक नागरिकांना दिसून येत असतो. काही दिवसांपूर्वी सांगुळवाडी रोड परिसरात गांगोमंदिर परिसरात गवा रेडा दिसुन आला होता आज सकाळी पहाटे वैभववाडी शहरात ऋषिकेश पांचाळ यांच्या घराच्या दारात गवा रेडा येऊन उभा राहिल्याचे आढळून आले. पहाटे सांगुळवाडी रोड परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जण आपलीच वाट बदलण्याच्या मार्गावर आहेत. एकंदरीत भविष्यात वैभववाडी शहरात गवा रेडा आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. सदर परिसरात पहाटे व सायंकाळी फिरताना नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे.

error: Content is protected !!