कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उमेदवारी निश्चित जाहीर झाली असून पक्षप्रमुख प्रमुखांकडून एबी फॉर्म देखील देण्यात आला ही घोषणा सायंकाळी उशिरा करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संदेश पारकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे कणकवली येथील आप्पा पटवर्धन चौकात व बाजारपेठेत जोरदार घोषणा देत फटाके देखील फोडले यावेळी संदेश भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देण्यात आल्या.