निलेश राणे यांची बाजू झाली आणखी भक्कम
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदारसंघातील हुकमी एक्का असलेले दत्ता सामंत यांनी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माजी खा.निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दत्ता सामंत यांनी शिवसेनेत केलेल्या पक्षप्रवेशामुळे कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे. दत्ता सामंत यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, निरिक्षक दीपक वेतकर , बाळा चिंदरकर आदि मान्यवर उपस्थित होते.











