आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उपळे उपडेवाडीतील ग्रामस्थांनी केला भाजपात प्रवेश

उपडेवाडी आमदार नितेश राणेंच्या राहणार पाठीशी : ग्रामस्थांनी दिला शब्द

वैभववाडी (प्रतिनिधी) : उपळे उपडेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत नितेश राणे यांना वाडीतील शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली. लोकसभा निवडणूकी दरम्यान काही कारणांनी यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या वाडीतील ग्रामस्थांनी घेतला होता. परंतु आमदार नितेश राणे यांनी उपळे गावात जाऊन या सर्व ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत त्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचा शब्द देत नाराजी दूर केली आहे. त्यामुळे उपडेवाडीतील संपूर्ण ग्रामस्थांनी भाजपात दाखल होत प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!