असलदे येथील दि्विजा वृद्धाश्रमात आजी आजाेबांनी केली दिवाळी साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू सणातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण, प्रत्येकजण दिव्यांची रोशनाई व गोड-धोड मिष्ठांन करून दिवाळी हा सण साजरा करत असतो.आज ५०० वर्षानंतर अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या भूमित दिवाळी सण पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने साजरा केला.

दि्विजा वृदाश्रमातील आजी-आजोबांनी दिवाळीचा सण साजरा केला.वसुबारस दि्विजा वृदाश्रमात गाई-वासराची पुजा करून साजरा केली.व वसुबारस साजरे केले. त्यानंतर दुसर्या दिवशी धन त्रयोदशीला आजी-आजोबांनी एकत्र मिळुन धनत्ररोस दिव्यांची रोशनाई करून साजरे केले.

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे आजी-आजोबा व कर्मचार्यानी मिळुन आजोबांचे पारंपरिक पद्धतीने सुंगधी उटणे लावुन आजोबांना अघोंळ घातली
त्यानंतर औक्षण करून घेतले.नंतर तुलसी समोर उभे राहुन प्रत्येकांनी कारट रुपी नरकाशराचे बलिदान दिले.त्यानंतर सर्व आजी- आजोबांनी बसुन सामुहिक रित्या दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला.

सायंकाळी दिव्यांची रोशनाई करुन अगदी थाटामाटात लक्ष्मी पुजन केले.देणगीदार श्री.नारकर यांनी आणलेल्या काजू कतली प्रसादाचा आस्वाद घेतला.तर आज चौथ्या दिवशी आश्रमातील ३३आजींनी आश्रमातील सर्व आपल्या भावांना औक्षण करून भाऊबीजेचा कार्यक्रम साजरा केला. ह्या प्रसंगी आश्रमाचे संचालक श्री.संदेश शेटये यांनी सर्व आश्रमातील आजी-आजोबांना दिवाळी भेंट म्हणून बक्षीसं दिली.

error: Content is protected !!