कणकवली तालुक्यातील चक्रीवादळ ग्रस्त भागाला महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची भेट

प्रशासनाला केल्या सूचना तात्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई द्या

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेळणे खुर्द येथे चक्रीवादळाने मोठे नुकसान झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी या नुकसानग्रस्त भागाला भेट देत पाहणी केली तेथील महापुरुष मंदिराला देखील भेट देत तिथे झालेल्या नुकसानाची पाहणी केली तसेच तलाठी किशोर चौगुले यांना तातडीने पंचनामे करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवा अशा सूचना दिल्या तसेच वरिष्ठांशी संपर्क साधत नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा जनतेचे मोठे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त यांच्या पाठीशी महाविकास आघाडी ठाम उभी राहील राहील अशी ग्वाही देखील संदेश पार्क यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत सरपंच अविनाश गिरकर यांच्यासह रामकृष्ण चाळके आदी उपस्थित होते

error: Content is protected !!