खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ संपन्न…

भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांची विशेष उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अंतर्गत विविध पक्षांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरवात केली असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे भारतीय जनता पार्टीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी ११.०० वाजता श्री ७२ खेड्याचे देवस्थान श्री देव कालभैरव मंदिरात भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आला.

यावेळी खारेपाटण गावातील श्री देव केदारेश्वर मंदिर येथे देखील प्रचाराचा नारळ फोडून व देवाला साकडे घालून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजप कार्यकर्ते माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,माजी महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू,.माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,सूर्यकांत भालेकर,राजा जाधव,भाजप ज्येष्ठ पदाधिकारी दादा कर्ले,मधुकर शेठ गुरव , प्रवीण लोकरे,भाऊ राणे,नंदकिशोर कोरगावकर, शमशूद्दिन काझी,इस्माईल मुकादम,महिला आघाडी प्रमुख उज्ज्वला चीके,खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, सुरेंद्र कोरगावकर,विठ्ठल गुरव, सुधाकर ढेकणे,विजय देसाई आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खारेपाटण विभागात भाजप पक्षाने प्रचारात सद्या आघडी घेतली असून यावेळी खारेपाटण विभागातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,चिंचवली सरपंच अशोक पाटील,नडगीवे सरपंच माधवी मण्यार,कुर बबलू पवार,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ,शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये वांरगाव उपसरपंच नाना शेट्ये,वांयगणी उपसरपंच प्रताप फाटक,तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस,भाजप पदाधिकारी वीरेंद्र चीके,शेखर शिंदे, रामा पांचाळ साधना धुमाळे, प्रणय गुरसाळे,गणेश कारेकर,किरण कर्ले,जयदीप देसाई,उपस्थित होते.

भाजप पक्षाचे उमेदवार नितेश राणे यांना विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असे आवाहन कणकवली तालुका भाजप अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!