मला हलक्यात घेऊ नका, काय ती बॉलिंग करा चौकार षटकार लावायला मी सज्ज

बॅट निशाणीवर लढणार आणि जिंकणार ; अपक्ष उमेदवार नवाज खानी यांचा विश्वास

मुस्लिम समाजासह सर्वधर्मीय जनतेच्या हितासाठी निवडणूकीच्या मैदानात

कणकवली (प्रतिनिधी) : नितेश राणे आणि संदेश पारकर यांनी मला हलक्यात घेऊ नये. 2019 मध्ये 34 मतांनी विजयाचे पारडे फिरले होते.मला बॅट निशाणी मिळाली असून नितेश राणे आणि संदेश पारकर या विरोधी उमेदवारांनी हवी ती बॉलिंग करावी मी 6 चेंडूत 6 सिक्सर मारायला सज्ज झालो आहे. मी उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी स्वप्ने बऱ्याच लोकांना पडत होती. माझी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. काल ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या मुस्लिम बांधवांनी पत्रकार परिषदेत मला उमेदवारी मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा अनाहूत सल्ला दिला. मात्र जे शिवसेना उबाठा चे मुस्लिम बांधव पदाधिकारी आहेत त्यांनी मला सल्ले देऊ नयेत.मी अपक्ष निवडणूक लढवत असून केवळ मुस्लिम समाजच नाही तर सर्व धर्मियांच्या हितासाठी मी निवडणूक लढवत आहे.मला ओळखत नाही म्हणणाऱ्या शिवसेना उबाठा च्या मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना माझ्यावर बोलण्याची वेळ का आली ? याचे परीक्षण करावे अशा शब्दांत बॅट निशाणीवर कणकवली विधानसभा लढविणारे अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी सादिक धोपावकर, आदिल खतीब, साहिल चौगुले रोहित पटाडे, विनायक जाधव उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नवाज म्हणाले की, शिवसेना उबाठा च्या मुस्लिम समाज बांधवाना मला उमेदवारी मागे घेण्यासाठी ची पत्रकार परिषद मागे घेण्यास संदेश पारकर यांनीच सांगितले होते. पत्रकार परिषद घेणारे सर्व माझे समाजबांधव हे आतून माझेच समर्थक असल्याचेही नवाज खणी यांनी सांगितले. संदेश पारकर हा आमदार नितेश राणे यांचा माणूस आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी आणखी कोण कोणाचा माणूस आहे हे मी पुराव्यांनीशी मिडियासमोर जाहीर करून पोलखोल करणार असल्याचा इशाराही नवाज खणी यांनी दिला. आपल्या भारत देशाचा झेंडा हा तिरंगा आहे ज्यात भगवा सफेद आणि हिरवा रंग सामील आहे. हाच सर्वधर्मसमभाव हा विचार घेऊन मी विधानसभा निवडणूक लढवत आहे. मी देवगड वैभववाडी कणकवली तालुक्यात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. मला मतदारसंघात फिरताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत जनतेच्या कार्यकर्त्यांच्या मी गाठीभेटी घेत आहे. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील जनतेला लाडका आमदार आणि सेटलमेंट करणारा आमदार नको असून खऱ्या अर्थाने विकास करणारा आमदार हवा आहे. मला जनतेच्या मनातील आमदार व्हायचे आहे.माझ्या साठी नाही तर जनहितासाठी मी निवडणूक रिंगणात आहे असेही नवाज खाणी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!