कणकवली विधानसभेत आमची मते निर्णायक ठरतील – संतोष शिंगाडे

कणकवली विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीने मनसेला गृहीत धरू नये 

कणकवली (प्रतिनिधी) : मागील लोकसभा निवडणूक 2024 ला माननीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार कोकणातील महाराष्ट्र सैनिकांनी दिवस रात्र मेहनत घेऊन महायुतीचा विजय खेचून आणला यात पक्षाचे संपर्क प्रमुख व विधानसभा प्रमुख  संतोष जनार्दन शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कार्यक्रमांची पद्धशीर आखनी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चोख प्रचार करण्यात आला होता . एवढंच काय तर स्वतः सन्माननीय राज साहेबांनी कणकवली येथे सभा घेऊन महायुतीचे उमेदवार यांचे लीड अजून मजबूत केल लोकसभेला कणकवली मध्ये ज्या वेळी महायुतीचे उमेदवार यांची प्रचार सभा असताना विधानसभेमधून 100 गाड्यांचा ताफा घेऊन कणकवली मध्ये सभेला उपस्थिती दर्शवली होती, आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन विषयक गावोगावी भेट घेत असताना यावेळी मनसे पक्षाची मते ह्या वेळी निर्णयाक ठरतील कारण आम्ही ज्या वेळी लोकांमध्ये फिरतो आहे त्यावेळी आम्ही लोकांचा कौल जाणून घेतल्यानंतर आमच्या सर्वेनुसार आम्हाला निर्णायक  मते आम्ही तयार केली आहेत तसेच आम्हीं कणकवली विधानसभेतील मुंबईस्थित रहिवासी लोकांचा मेळावा घेतला  त्यात 300 ते 400 चाकरमानी उपस्थित होते त्या मध्ये त्या लोकांचा निर्धार असा  होता की यावेळी आम्ही आणि आमचे गावचे नातेवाईक सर्व जण राजसाहेबांच्या उमेदवाराला मतदान करणार आणि  त्यांचा सर्वांचा पाठिंबा आपल्या पक्षाला असेल आणि संतोष भाऊ शिंगाडे यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू असा त्यांनी निर्णय घेतला होता तसेच आम्ही कित्येक दिवस विधान सभेमध्ये भेटीघाटी घेत असताना ज्यावेळी आम्ही गावोगावी फिरत होतो त्यावेळी तेथील सर्व स्थानिक लोक पक्षाच्या पाठी खंबीर उभे राहतील तसेच  त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आम्हाला गृहीत धरू नये

आमची मतेच निर्णायक ठरणार एवढं नक्कीच…. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आम्ही आमची योग्य ताकद दाखवू येवढं नक्की तसेच जिल्ह्यासहीत देवगड,वैभववाडी, कणकवली तालुक्यात पक्षाची मजबूत बांधणी चालू असून सर्व गावागावत आमच्या शाखाचे जाळे आम्ही विनत आहोत, लवकरच शाखा निहाय कार्यक्रम आयोजित करून देवगड सहित विधानसभा क्षेत्रात प्रबळ बांधणी करणार असल्याचे संकेत संतोष भाऊ शिंगाडे यांनी दिली

error: Content is protected !!