स्थानिक आमदारामुळे लागलेला भ्रष्टाचाराचा टक्केवारीचा काळिमा जनताच पुसेल – विनायक राऊत

वैभववाडीत संदेश पारकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी (प्रतिनिधी) : येथील बुद्ध विहार येथे संदेश भाई पारकर यांच्या प्रचारार्थ बेठक संपन्न झाली.. विधानसभा सभेच्या या कार्यक्षेत्रामध्येच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या गावी कोणताही प्रसंग होतो कोणी आवाज देऊ कोणी हाक मारो वेळी यावेळी रात्री अपरात्री तिथे हमखास धावून जाणारे जे आपले ठराविक मंडळी आहेत ना त्याच्या मध्ये संदेश भाई पारकर आहेत  आणि हा कार्यकर्त्याच्या भूमिकेतून वावरणारा आपला मित्र आमदार व्हावा असं कोणाला वाटणार नाही प्रत्येकालाच वाटतं आणि सुदैवाने उद्धव ठाकरे साहेबांनी तुमच्या मनातलं ओळखलं या विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनातलं ओळखलं आणि संदेश भाई परकर सारखा एक उत्साही उमेदवार या मतदार संघात काया पालक करणारा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती केलेले आणि मला खात्री आहे आमच्या सुशांत नाईक यांनी सुद्धा मागच्या वर्षभरामध्ये या मतदारसंघात खूप चांगलं काम केलं  संदेश भाईंच्या विजयामध्ये सुशांत नाईक असेल सतीश सावंत साहेब असतील तुम्हा सर्वांचे योगदान अत्यंत मोलाच असेल आमचे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत एनसीपी चे पदाधिकारी आहेत सर्व लोकांनी एकत्रित येऊन या विधानसभेला या विधानसभा क्षेत्राला लागलेला जो काळीम आहे भ्रष्टाचाराचा टक्केवारीचा आणि मातोश्रीचा सातत्याने अपमान करणारा नितेश राणेच्या हृदयामध्ये भिनलेले आहे अशा या कोकण संस्कृतीला घातक ठरणाऱ्या आमदाराचा पराभव या वेळेला करावाच लागेल यासाठी आपल्याला बोलावलं आहे असे संभाषण विनायक राऊत साहेब यांनी समोरील कार्यकर्त्यांना केले.. यावेळी उमेदवार संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा जिल्ह्याप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मंगेश लोके, नंदू शिंदे, स्वप्निल धुरी, विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..

error: Content is protected !!