माजी सरपंचासह माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
वैभववाडी (प्रतिनिधी) : वेंगसर माजी सरपंच सुभाष कांबळे व कुसुर गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष पाटील व कार्यकर्ते तसेच कोळपे व जांभवडे येथील अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
वैभववाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत वेंगसर माजी सरपंच सुभाष कांबळे, कुसूर येथील संतोष पाटील, साहिल पाटील, संदीप म्हापुस्कर, सुहास मुद्रस, प्रकाश पाटील, कोळपे येथील सत्तार बक्कर, नवाज ठाणगे, अलीसाहेब भेरी, जांभवडे येथील प्रमोद बोलये, प्रकाश पालांडे,नितेश आयरे, संतोष पालांडे, संजय पालांडे, आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार राऊत यांनी स्वागत केले.
यावेळी संदेश पारकर,शिवसेना नेते सतीश सावंत,युवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नंदू शिंदे, मंगेश लोके, स्वप्नील धुरी,रजब रमदुल, जावेद पाटणकर, यांच्यासह शिव सेना पदाधिकारी उपस्थित होते.











