वैभववाडीत महायुतीची 12 नोव्हेंबरला प्रचार सभा

खासदार नारायण राणे, विनोद तावडे व प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. नितेश राणे यांची प्रचार सभा मंगळवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता येथील भाजपा कार्यालय समोर आयोजित करण्यात आली आहे. वैभववाडी भाजपाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच महायुतीचे उमेदवार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

तरी या सभेला महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, भाजपा बुथ अध्यक्ष, भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व सरपंच, कार्यकर्ते, महिला व युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.

error: Content is protected !!