फोंडाघाट मधील चतुरस्त्र कार्यकर्ता अण्णा तायशेटे यांचे दुःखद निधन!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील युवा कार्यकर्ता, बाल गोपाळ मित्र मंडळ चा चतुरस्त्र कार्यकर्ता, भीखू राधाकृष्ण तथा स्वामीअण्णा तायशेटे (४८वर्षे) यांचे ओरस येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार दरम्यान शनिवारी रात्री ९ चे दरम्यान दुःखद निधन झाले.काही काळात त्यांनी एसटीमध्ये सेवा दिली होती. बालगोपाळ मित्रमंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. विशेषतः मंदिरातील भजन आणि उपक्रमा मध्ये त्यांचा उत्साही सहभाग होता. वाहतूक कोंडी सोडवीन्यासाठी ते सदैव तत्पर असत. सर्वांना मदत करण्याच्या त्याचे स्वभावामुळे ते स्वामीअण्णा म्हणून सुपरिचित होते. मित्राच्या जाण्याने पोकळी निर्माण झाल्याची वेदना मित्र परिवारातून व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे.रविवारी अंत्ययात्रेत मित्र परिवार,आप्तेष्ट सहभागी झाले होते.वैकुंठभूमीत त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यात आली.

error: Content is protected !!