रात्रंदिवस जनतेसाठी काम करणारा माझा नितेश मी जिल्ह्याला दिला

नितेश विजयी हॅट्ट्रिक करून मंत्री होणार

नीलम राणे यांचे वैभववाडीत महिला कार्यकर्त्यांना विजयमंत्र

वैभववाडी (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेची रात्रंदिवस काम करण्याची पद्धती बघितली की, मला त्याच्यात राणे साहेबांची छबी दिसते. या मतदार संघात गेली 10 वर्षे तो आमदार म्हणून काम करीत आहे. विकास कामे असोत की कोणती योजना राबवायची असो, तो कुठेही कमी पडत नाही. असा रात्रंदिवस जनतेसाठी काम करणारा माझा मुलगा मी जिल्ह्यासाठी दिला आहे. यावेळी तो विजयाची हॅट्रिक करेल व राज्यात मंत्री होईल असा विश्वास जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा तथा आमदार नितेश राणे यांच्या मातोश्री नीलमताई राणे यांनी व्यक्त केला.

वैभववाडी भाजपा कार्यालयासमोर महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या  प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात बोलत त्या होत्या. यावेळी भाजपा प्रभारी महिला मोर्चा संयोजिका तथा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, सुमेधा पाताडे, अस्मिता बांदेकर, प्राची तावडे, नेहा माईणकर, सीमा नानिवडेकर, स्नेहलता चोरगे, अक्षता डाफळे, श्रद्धा रावराणे, यामिनी वळवी, संगीता चव्हाण, सुप्रिया तांबे, सुंदरा निकम, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ. मुद्रस व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, खरं तर नितेश ज्या पद्धतीने काम करतो ते पाहिलं तर तुम्ही त्याला बिनविरोध निवडून दयायला पाहिजे. गेली 40/45 वर्ष आपण राणे साहेब जिल्ह्याचे राजकारण करताना बघत आले आहे. राणे साहेबांप्रमाणे सर्वांना अंगावर घेऊन काम करण्याची पद्धत आहे. मात्र एक आई म्हणून मला भीती वाटते. राणे साहेबांचा काळ वेगळा होता आताच काळ वेगळा आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत नितेश काम करीत आहे. अशाच पद्धतीने राणे साहेब काम करायचे. त्यामुळे त्यांच्यात मला राणे साहेबांची छबी दिसते.असे भावनिक उद्गगार काढत येत्या 20 तारीखला त्याला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. विरोधक राणे परिवार टीका करतात परंतु त्याला आम्ही उत्तर देऊन मोठे करणार नाही.असेही त्या म्हणाल्या.

तर सुलोचना सावंत म्हणाल्या,महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा आहे. त्यासाठी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.या मतदारसंघात नितेश राणे यांचे काम उत्तम प्रकारे चालले आहे. मागील अडीच वर्षात मतदार संघातील विविध विकास कामांसाठी 3165 कोटी इतका निधी त्यांनी आणला आहे. कोरोना काळात देखील नितेश राणे जनतेच्या पाठीशी राहिले आहेत. महिलांसाठी विविध योजना महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. काम करणाऱ्या आमदाराच्या पाठीशी उभे राहून मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढला पाहिजे. याची जबाबदारी देखील आता महिलांची आहे. शेतीची कामे आहेत याची आपल्याला जाणीव आहे. परंतु काम करत असताना देखील आपण प्रचार केला पाहिजे. कोणाला निवडून द्यायचं, आपलं चिन्ह कोणतं, याची चर्चा महिलांमध्ये झाली पाहिजे असे सांगितले. यावेळी श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर, यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा कांबळे तर आभार प्राची तावडे यांनी मानले.

error: Content is protected !!