आचरा (प्रतिनिधी) : चिंदर येथील शिवकालीन तलावाकाठी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री आकारी ब्राह्मण देव मंदिर येथील वार्षिक सातप्रहाराचा हरीनाम सप्ताह कार्तिक शु. एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सकाळी विधिवत पूजे नंतर 9 वाजता हरीनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. यावेळी दशक्रोशीतील विविध भजन मंडळे आपली भजन रुपी सेवा सादर करणार आहेत. तसेच बुधवारी हरीनाम सप्ताहाची समाप्ती समादना कार्यक्रमाने होणार आहे. तरी भाविक भक्तांनी हरीनाम सप्ताहचा लाभ घ्यावा असे आवाहन गावठणवाडी उन्नती मंडळ चिंदर यांनी केले आहे.











