खारेपाटण मध्ये कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतली जोरदार आघाडी
खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी,शिवसेना (शिंदे गट) व आर पी आय महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ खारेपाटण शहरातील महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते एकटवले असून कार्यकर्त्यांनी संपूर्ण खारेपाटण मध्ये घर टू घर प्रचार करत प्रचारात आघाडी घेतली आहे.
महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारा करीता खारेपाटण येथे आज शिवसेना शिंदे गटाचे कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव,महिला तालुका प्रमुख श्रीम.प्रिया टेमकर,श्रीम. शोभा बागवे,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,सुहास राऊत यांनी सक्रिय सहभाग घेतला. खारेपाटण ज्येष्ठ भाजप पदाधिकारी रमकांत राऊत खारेपाटण सरपंच सौ.प्राची इसवलकर यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आपआपसातील मतभेद सर्वांनी बाजूला ठेऊन एकत्र मिळून आमदार नितेश राणे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया असे ठरविण्यात आले.
खारेपाटण मध्ये आज भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी डोर टू डोर प्रचार करण्यात आला.यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रिया टेमकर,शोभा बागवे,यांसह भाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत,भाऊ राणे सुरेंद्र कोरगावकर,कांता झगडे,राज बागडी,विकी सोनी,सिद्धेश शेट्ये, महावीर होनाळे,गणेश कारेकर,राज गुरव,निरंजन चव्हाण,अनिल गुरव,महिला कार्यकर्त्या आरती गाठे,साधना धुमाळे,ग्रा.पं.सदस्य मानली होनाळे,समीक्षा गुरव,आदी भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान खारेपाटण मध्ये खारेपाटण बाजारपेठ,कोष्टेवाडी, पंचशील नगर,कर्लेवाडी,गुरववाडी, राऊत वाडी,ब्रम्हपुरी,रामेश्वर नगर, तावडेवाडी,जैनवठार आदी भागात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून सर्व कार्यकर्ते सद्या ॲक्शन मोडवर असल्याचे चित्र दिसत आहे.
एकंदरीत महायुतीने खारेपाटण मध्ये प्रचारात जोरदार मुसंडी घेतली असून खारेपाटण मधील बंदरवाडी, सम्यक नगर,संभाजी नगर, काझीवाडी, टाकेवाडी,हसोळ टेंब – कोंडवाडी या भागात लवकरच प्रचाराची फेरी पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.











