वाहन चालक आणि पर्यटकांचे हाल —
फोंडाघाट (प्रतिनिधी) : घाटात भालेकर हॉटेलच्या खालच्या वळणावर एका खड्ड्यामध्ये एक कंटेनर चे पाटे तुटल्याने बंद पडल्यावर ड्रायव्हर क्लिनर रात्री गाडी सोडून पळून गेले .त्यामुळे घाटातील वाहतूक रात्रीपासून बंद झाली होती. मात्र स्थानिक जेसीपी धारकांनी पवन भालेकर व सहकाऱ्यांनी गाडी एका बाजूला करून छोट्या गाड्यांची वाहतूक सुरू केली. मात्र मोठे कंटेनर ट्रॉलर्स चिरे ट्रक इत्यादीची वाहतूक मात्र खोळंबलेली होती. त्यामुळे अपघात स्थळापासून हवेलीनगर पर्यंत आणि मागे खिंडीपर्यंत वाहतुकीची लाईनच लाईन लागली होती. मात्र आरटीओ पोलीस आणि स्थानिक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत – पर्यटक आणि वाहनधारकांचे मात्र रात्रीपासून हाल सुरू आहेत… त्यामुळे रस्त्याचे हॅम ठेकेदार याकडे कधी लक्ष देणार याबद्दल फोंडावासीय आणि वाहन चालक यामध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे











