आचरा (प्रतिनीधी) : भारताच्या संविधान दिना निमित्ताने आचरा पोलिस स्टेशन मध्ये पोलीस व कर्मचाऱ्यानी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी उद्देशिकेचे वाचन करून महत्व सांगितले.
भारतीय राज्य घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. यादिनाचे औचित्य साधून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी पी. एस. आय. चोरगे, हेडकॉन्सटेबल सुदेश तांबे, मनोज पुजारे, किशोर खुडे, स्वप्नाली तांबे, ज्योती परब आदी उपस्थित होतं











