भुईबावडा घाटात ट्रक बंद पडल्याने वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनीधी) : भुईबावडा घाटात ट्रक बंद पडल्यामुळे या घाटातील वाहतूक मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून ठप्प झाले आहे. यामुळे कोल्हापूर वरून येणाऱ्या एसटी बस वैभववाडी कडून जाणाऱ्या एसटी बस घाटात अडकून पडल्या आहेत. तर दोन्हीही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील अवसरमोल आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गगनबावड्याकडे जाणारा एक ट्रक भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर बंद पडला आहे ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाले आहे. फक्त छोट्या गाड्या सुरू आहेत. सायंकाळी येणाऱ्या अक्कलकोट वेंगुर्ले, महाबळेश्वर पणजी, सोलापूर राजापूर, पुणे विजयदुर्ग,तुळजापूर देवगड या गाड्यांसह वैभववाडी कडून गगनबावड्या कडे जाणाऱ्या वेंगुर्ले कोल्हापूर या दोन बस घाटात अडकून पडले आहेत.त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. वैभववाडी पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. ट्रक दुरुस्तीचे प्रयत्न सुरु आहेत. रात्री उशिरा पर्यंत वाहतूक ठप्प होती.

error: Content is protected !!