खारेपाटण तालुका कृती समिती व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत घेतली सदिच्छा भेट
पुढील वाटचालीस दिल्या शुभेछा..
खारेपाटण (प्रतीनिधी) : कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे भाजपा आमदार नितेश राणे व राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैया सामंत यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण तालुका कृती समितीच्या पदाधिकारी तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खारेपाटण हे गाव सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील महत्वाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे गाव असून जिल्ह्याच्या खारेपाटण येथील सीमेच्या उत्तर व दक्षिण बाजूचे दोन्ही महायुतीचे आमदार बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी खारेपाटण येथील खारेपाटण तालुका कृती समितीचे पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मुंबईला गेले होते.यावेळी त्यांनी नवनिर्वाचित आमदार नितेश राणे व आमदार किरण उर्फ भैया सामंत यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या. व मतदार संघातील विकास कामाबाबत चर्चा केली.
यावेळी खारेपाटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत उपाध्यक्ष मंगेश गुरव, सचिव – संतोष पाटणकर, खजिनदार महेश कोळसुलकर, समिती सदस्य तथा खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, सुहास राऊत आदी प्रमुख पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते आमदार नितेश राणे व आमदार किरण उर्फ भैया सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेछा देण्यात आल्या.