आमदार नितेश राणे यांच्या पक्षाचा भाजपा सेल पदाधिकारी कत्तलीला जाणाऱ्या गाईंच्या आरोपींचे वकीलपत्र घेतो

हे हिंदुत्व स्वयंसेवक संघ व नितेश राणेंना चालते का – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

कणकवली (प्रतीनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट वर अवैध रित्या गुरांची वाहतूक करनारा ट्रक पकडण्यात आला. सदर गुरे वाहून नेणारा ट्रक हा गुरांची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याच्या बातमीने सर्वत्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या ट्रक मध्ये गावठी गायी व वासरे अशी मिळून सुमारे 19 पाळीव जनावरे आढळून आली. त्या ट्रक चालक व संबधित आरोपीनंवर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई नंतर हिंदूंचे गब्बर समणारे आमदार नितेश राणे यांचाच भाजप वकील सेल चा एक पदाधिकारी ॲड. पळरुळेकर यांनी त्या गो माता कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या आरोपीचे वकील पत्र घेतो. याच्यावरून नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचे धडे शिकवले नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होतो. आपल्या सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर करणारे आमदार यांचे खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे दात वेगळे आहेत. हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी वरचे वर हिंदुत्वाचा वापर करतात. एका ठिकाणी हिंदू न्याय यात्रा काढायची व दुसरीकडे आपल्याच भाजप पक्षाचा पदाधिकारी आपल्या गो मातेंचे कत्तल करणाऱ्या आरोपीचे वकील पत्र घेतो. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने असे हिंदुत्वाच्या पलीकडे गेलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे काय असा प्रश्न देखील जनतेतून उपस्थित केला जात आहे. असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!