महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आयुष्यमान आरोग्य मंदिर धामापुर आणि ग्रामपंचायात धामापुर यांचे यशस्वी आयोजन
चौके (प्रतीनिधी) : आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व न्युरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन, प्रा. लि. बेंगलोर आणि आयुष्यमान आरोग्यमंदिर धामापूर व ग्रामपंचायत धामापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत धामापूर येथे महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्ततपासणी मध्ये प्रामुख्याने CBC, TSH, Sr. Cholesterol, Sr. Calcium, Hba1c या तपासण्या करण्यात आल्या ल.
या शिबीराचे उदघाट्न मालवण गटविकास अधिकारी श्री. प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, माघाठणे मुंबई च्या भाजपा महिला मोर्चा महामंत्री तथा समाजसेविका सुचित्रा पेडणेकर, ग्रामपंचायत अधिकारी पूजा वानोळे, प्रा. महेश धामापूरकर, उद्योजक महेश परब, माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, वर्षा सुतार, सुप्रिया घाडी, टेली मेडिसिन प्रकल्प सहाय्यक समन्वयक सुमित सावंत, ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी धामापूरकर, साक्षी नाईक, प्रशांत गावडे, स्वप्निल नाईक, आरोग्य सेविका गौरी कसालकर, समुदाय आरोग्य अधिकारी दिव्या शेवडे, आरोग्य सेवक एस. डी. वेंगुर्लेकर, प्लेबोटोमिस्ट माया इन्सुलकर, टेली मेडिसिन स्टाफनर्स मीनल पाटकर, आशा स्वयंसेविका शितल वालावलकर, मंजिरी मेस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांचा ग्रामपंचायत च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. वालावलकर यांनी असे सांगितले की, ” माझ्या कारकीर्दित आरोग्यमंदिर उपकेंद्र असं नाव असलेलं उपकेंद्र पहिलच धामापूर गावात पाहिलं. स्त्री हा कुटुंबाचा महत्वाचा घटक आहे, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारताना महिला मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात अशा महिलांची काळजी घेण्यासाठी धामापूर ग्रामपंचायतीने हे चांगले पाऊल उचलले आहे. ” असे सांगत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबाविल्याबद्दल सरपंच मानसी परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचें कौतुक केले.