माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क आहे – प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी

वैभववाडी (प्रतिनिधी) : म. प्र.शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी जागतिक मानवी हक्क दिन संपन्न झाला. याप्रसंगी प्रा.एस.एन. पाटील यांनी मानवी हक्काची संकल्पना काय असते आणि मानवी हक्क नसेल तर काय होईल ? याविषयी अनेक ऐतिहासिक दाखले देऊन मानवी हक्काचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित उपप्राचार्य डॉ. एम.आय. कुंभार यांनी मानवी हक्काचे महत्व सांगितले, त्यांनी आर्थिक व सामाजिक हक्क प्रत्येकाला प्राप्त झाले पाहिजे याविषयी त्यांनी माहिती दिली. माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा सारखाच हक्क आहे म्हणून आज समाजामध्ये माणसा माणसात भेद मानला जातो तो भेद नष्ट झाला पाहिजे प्रत्येकाने एक दुसऱ्यांबरोबर वागताना समानतेबरोबर बंधू भावाने वागले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक शास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. आर. एम. गुलदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्रा.एस.आर.राजे , डॉ. संतोष राडे-पाटील, डॉ. बी. डी. इंगवले, प्रा. डी. एस. बेटकर  प्रा. निलेश कारेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!