वैभववाडी (प्रतिनिधी) : कुसूर विकास बौध्द मंडळ, मुंबई,स्नेहवर्धिनी महिला मंडळ (कुसूर) – मुंबई यांच्यावतीने धर्मांतर व मंडळाचा हीरक महोत्सव विविध उपक्रमाणे शिरोडकर हायस्कूल परळ मुंबई येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अनिल मुणगेकर हे होते. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष उज्वला कुसुरकर, नारायण कुसुरकर, मोतीराम यादव, स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त चीफ मॅनेजर धनाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला दीप प्रज्वलन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. तर तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेला अनिल मुणगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.मंडळाचे सरचिटणीस श्री रमेश कुसूरकर यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी शालांत परीक्षेत गावाच्या शैक्षणिक इतिहासात शेकडा ९४ टक्के अत्युच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सार्थक प्रशांत यादव या विद्यार्थ्यासोबत,उच्च माध्यमिक,पदवीधर,/द्विपदवीधर,तंत्रशिक्षण, कायदा,व्यावसायिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी, एस एन डी टी महिला विद्यापीठात एम ए (इतिहास) सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक विजेती सौ.नेहा निर्मळ जाधव आणि आय आय टी मुंबईची पीएच.डी. पदवीधारक मनाली विजय जाधव यांच्यासह २५ शैक्षणिक गुणवंत आणि जेष्ठ नागरिक व मोतीराम यादव,नारायण कुसूरकर यांचा मंडळाच्या आणि धनाजी जाधव कुटुंबियांच्यावतीने प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
मंडळाचे सल्लागार धनाजी जाधव यांनी मागील सहा दशकातील मंडळाच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक आणि महिला विकासात्मक कार्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी नारायण कुसूरकर, मोतीराम जाधव यांची समायोजित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक कार्याचे दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास कुसूर मंडळाचे आणि स्नेहवर्धिनीचे आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते,पत्रलेखक सुर्यकांत भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवानेते प्रमोद नाईक,अभियंता अमोल यादव, स्वप्निल जाधव, प्रा. मेघा यादव, प्रा. सुशील जाधव, डॉ. शिल्पा यादव, सुनील तांबे, आनंद जाधव यांच्यासह मोठया संख्येने मंडळाचे सभासद उपस्थित होते.
महिलांसाठीच्या लकी ड्रॉ मध्ये स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या खजिनदार नम्रता प्रशांत यादव विजेत्या ठरल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मळ जाधव, चंद्रमणी जाधव, तुषार जाधव, अतुल जाधव, धम्मरत्न यादव, शरद यादव, रुपाली यादव, स्मिता कुसूरकर, मानसी यादव, नम्रता यादव, श्यामल यादव निलम यादव, मिताली यादव, अनिता यादव इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न घेतले. स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. उज्वला राजेंद्र कुसूरकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.