मनसे पदाधिकारी दीपक पार्टे यांचा विहिरीत बुडून मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे सरदारवाडी येथील दीपक यशवंत पार्टे वय ५२ यांचा घराच्या शेजारी असलेल्या विहिरीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघड झाली. मयत पार्टे हे मनसेचे तालुका सरचिटणीस म्हणून काम करीत होते. त्यांचा पुतण्या मोहित पार्टे याने याबाबत वैभववाडी पोलीस ठाणेत खबर दिली आहे. मात्र ते विहिरीत कसे पडले, की त्यांनी आत्महत्या केली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

मयत पार्टे यांच्या घराशेजारी विहीर आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांचा पुतण्या पाणी आण्यासाठी विहिरीवर गेला.त्यावेळी त्याला चुलते दीपक पार्टे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.याबाबत त्यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत माहिती दिली. वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकार्यांसह घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

ते विहरीत कसे पडले, की त्यांनी आत्महत्या केली,याबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही.दीपक पार्टे हे वैभववाडी तालुका मनसे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.त्यांचा स्वभाव हसतमुख व मनमिळाऊ होता.त्यांच्या आकस्मिक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!