कवी लेखक व्याख्याते संजय कळमकर यांची विशेष उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व कै.प्रभाकर लक्ष्मण पाटील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स युनियर कॉलेज खारेपाटण तसेच तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांचा शालेय विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम तसेच या शाळेत शिकलेल्या आजपपर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्संयुक्तिक स्नेहमेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ गुरवार दि. २६ डिसेंबर २०२४ सकाळी १०.०० वाजता होणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य संजय सानप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दि. २६ डिसेंबर २०२४ ते दि. ३० डिसेंबर २०२४ असा सलग पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेज. शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून विशेष म्हणजे शाळेच्या आजपर्यंतच्यामाजी विद्यार्थ्यांचा रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी भव्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते संजय कळमकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर याचवेळी माजी विद्यार्थ्यांचा संवाद मेळावा व शाळेविषयी आठवणी, मनोगते व माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
तसेच सोमवार दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य विर शंकरराव पेंढारकर सर यांचा स्मृतिदिन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला राजापूर तहसीलदार विकास गंबरे तसेच कादंबरीकार, कवी, समीक्षक असलेले प्रा.डॉ.महेश खरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गुरुवर्य पेंढारकर यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाने या शालेय विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गुरवार दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी उद्घघाटनच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोकणी रानमाणूस फेम प्रसाद गावडे, कवी व गायक दादा माडकईकर, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांसह संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे सचिव महेश कोळसुलकर यांसह संस्थेचे संचालक व स्थानिक संस्थाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. दू. १ ते २ स्नेहभोजन दु. २ ते ४ दयानंद पेडणेकर यांचे गायन व मनोरंजनात्मक खेळाचे सादरीकरण व सायं. ५ ते ८ या वेळात शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागाच्या लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
तसेच शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी स. १०.वा. कथाकथन कार्यक्रम सादर होणार असून यावेळी कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर, पुणे येथील कथाकार मारुती यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दु.१ ते २ सनेहभोजन दु. २ ते ४ समीर चाराटकर यांचे गायन व मनोरंजनात्मक खेळाचे सादरीकरण होणार आहे. तसेच ४ ते ५ या वेळात महेंद्र गवाणकर यांच्या संमोहन कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे आणि सायं. ६ ते ९ या वेळात माध्यमिक विभाग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
तसेच शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रेरणादायी व्याख्यान व कविता वाचन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ‘दंगलकार’ फेम कवी नितीन चंदनशिवे, निवृत्त सहा. पोलीस आयुक्त कांतीलाल कोथंबिरे, उद्योजक मनोज गुळेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दु. १ ते २ स्नेहभोजन दु.२ ते ४ वा फिशपोंड, अंताक्षरी, फनी गेम इत्यादी कार्यक्रम सादर होणार आहेत. तर सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजता सिनियर कॉलेज विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
तरी या संपूर्ण कार्यक्रमा करीता नागरिकांनी व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन खारेपाटण हायस्कूलचे चे पर्यवेक्षक श्री संतोष राऊत यांनी केले आहे.













