दोडामार्ग (प्रतिनिधी) : हेवाळे गावात दाखल झालेल्या जंगली टस्कर हत्ती कडून नुकसान सत्र सुरू आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. जंगली टस्कर हत्ती लोकवस्ती मध्ये येऊ नये नुकसान करु नये यासाठी मंगळवारी रात्री हेवाळे गावात वन कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ हत्तीला हुसकावून लावण्यासाठी थांबले असताना टस्कर हत्ती दाखल होऊन दत्ताराम देसाई यांच्या घराशेजारी असलेला भैला माड पाडून त्याचा फडशा पाडला. आरडाओरडा फटाके लावून देखील हा टस्कर हत्ती काही मिनिटे तेथेच होता. सुदैवाने माड घरावर टाकला नाही.
हेवाळे गावात टस्कर हत्ती कडून धुडगूस
