नांदगाव येथे अयोध्या प्रभू श्री राम मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा होणार साजरा

नांदगाव (प्रतिनिधी) : अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

कार्यक्रम पुढील प्रमाणे भव्य रॅली सकाळी ९.३० वा. नांदगाव तिठा येथून रॅलीची सुरुवात, सकाळी १० वा मोरयेवाडी राम मंदिर (आरती ), सकाळी १०.३० वा. नांदगाव गोसावी -कुभांरवाडी राम मंदिर (आरती ), ११.३० वा. बोभाटेवाडी हनुमान मंदिर (आरती ),१२.१५ वा. नांदगाव तिठा येथे रथातील श्रीरामांची पूजा व आरती , दुपारी १ ते ३ नांदगाव तिठा येथे महाप्रसाद तरी सर्व श्रीराम भक्तांना कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!