खा. नारायण राणेंकडून सी.ए.तन्वी कदम चे विशेष कौतुक

कणकवली (प्रतिनिधी) : सी.ए. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश मिळविलेल्या तन्वी संतोष कदम हिचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व नीलम राणे यांनी विशेष कौतुक केले. खासदार मुंबई जुहू येथील अधिश निवासस्थानी तन्वी हिने वडील संतोष कदम यांच्यासह राणे दाम्पत्याची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी खासदार नारायण राणे, नीलम राणे यांनी आस्थेने तन्वी हिच्याशी संवाद साधला. अत्यंत काठिण्य पातळीवरील सनदी लेखापाल ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे तसे कठीण असते. मात्र तन्वी हिने जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत घेत हे सुयश मिळविले त्याबद्दल तन्वी आणि तिचे वडील संतोष कदम यांचेही अभिनंदन केले.

error: Content is protected !!