कासार्डे आनंदनगरमधील सुलक्षणा चंद्रकांत मोरे यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे (आनंदनगर) येथील रहिवासी सुलक्षणा चंद्रकांत मोरे वय (65) यांचे गुरुवार दि.-16/01/2025 रोजी हृदयविकाराच्या आजाराने आकस्मित निधन झाले आहे. कासार्डे आनंदनगर मधील सेवानिवृत्त पोलिस हवालदार चंद्रकांत मोरे याच्या त्या पत्नी होत्या.त्यांच्या पाश्चात पती,चार विवाहित मुलगे,सुना,नाती, नातू,दिर,भावजय,ननंद,पुतणे,पुतन्या असा मोठा परिवार आहे.त्याच्या निधनाने कासार्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!