कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी प्रो आर्क वेल्डिंग अँड कटिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आला आहे. सदर प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या शाखेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ऑफलाइन पद्धतीने प्लेसमेंट ड्राईव्ह होणार असून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. डी.एस. बडकर आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत करण्यात आले आहे.
एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे 21 जानेवारी 2025 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन










